सोशल मीडियावर सक्रिय नसण्याबाबत चिन्मय मांडलेकरनं मांडल स्पष्ट मत

Anuradha Vipat

चिन्मय मांडलेकर

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर

सक्रिय

चिन्मय इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसतो

मुलाखत

काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकरने एक मुलाखत दिली होती

न राहण्यामागचं कारण

यावेळी चिन्मयने सोशल मीडियावर अधिक सक्रिय न राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. 

ती खूप मोठी गटार गंगा

चिन्मय म्हणाला, “मी सोशल मीडियावर नाही म्हणून मी काम करतोय. आयुष्यात मला ट्विटर (एक्स) जमलं नाही. कारण मला ती खूप मोठी गटार गंगा वाटते. त्यामुळे मी त्या वाटेला जात नाही. 

 हे जगाला कळावं

मी कुठं जातोय? काय करतोय? कुठे जेवलो? कुठे गेलो? काय खाल्लं? माझ्या कुटुंबातील सदस्य काय करतात? हे जगाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या पण आयुष्यात काम आहे. त्यामुळे सोशल मी मीडियापासून दूर असतो असंही यावेळी चिन्मय म्हणाला

" बाई गं " मध्ये स्वप्नील दिसणार या सहा अभिनेत्रींसोबत