Aarti Badade
शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिने आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. लोक ते भाज्या, स्नॅक्स आणि करीमध्ये आवडीने खातात.
Sakal
पनीर हे फुल-क्रीम दुधापासून बनवले जाते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, ते दररोज खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढेल का?
Sakal
पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल दोन्ही असते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास, विशेषतः तेलात किंवा तुपात शिजवल्यास, कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
Sakal
वाईट कोलेस्टेरॉल (LDL) वाढल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो. जास्त पनीर आणि फायबर कमी असलेल्या आहारामुळे LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
Sakal
पनीर नेहमी माफक प्रमाणात (Moderation) खा. ते फायबरयुक्त भाज्या आणि धान्यांसोबत खा. यामुळे पोट भरलेले राहील आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखता येईल.
Sakal
ज्या लोकांना आधीच लठ्ठपणा, हृदयरोग किंवा उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) आहे, त्यांनी पनीर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
Sakal
पनीर तुमच्या आरोग्यासाठी वाईट नाही. फक्त ते योग्य पद्धतीने आणि संतुलित प्रमाणात खा. लक्षात ठेवा समतोल (Balance) महत्त्वाचा आहे!
Sakal
Chia Seeds and Yogurt
Sakal