Aarti Badade
रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शांत आणि हिरवाईने नटलेले गाव आहे. निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास आहे.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
गावाच्या परिसरात घनदाट झाडी, काजूची झाडे आणि डोंगररांगा पाहायला मिळतात. शहराच्या धावपळीपासून दूर शांत वातावरणाचा अनुभव येथे घेता येतो.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
चोरवणे परिसरातील नागेश्वर मंदिर आणि गुहेकडे जाणारा ट्रेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. सह्याद्रीच्या जंगलातून जाणारी ही वाट ट्रेकिंगप्रेमींसाठी आकर्षण ठरते.
Chorawane Village Konkan Tourism
sakal
ट्रेकदरम्यान हिरवीगार झाडी, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि पावसाळ्यात छोटे धबधबे पाहायला मिळतात. पश्चिम घाटातील विविध पक्षी आणि जैवविविधतेची झलकही अनुभवता येते.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
चोरवणे गावातील श्री रामवर्दायिनी देवी मंदिर आणि स्वयंभू नागेश्वर स्थळाला धार्मिक महत्त्व आहे. स्थानिकांच्या श्रद्धा आणि परंपरांमुळे गावाची सांस्कृतिक ओळख जपली गेली आहे.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
पारंपरिक कोकणी घरे, अंगणे, ग्रामदैवतांची मंदिरे आणि स्थानिकांचा आपुलकीचा पाहुणचार यामुळे चोरवणे गावाची वेगळीच ओळख निर्माण होते.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
पावसाळ्यात गाव परिसर हिरवाईने बहरतो, तर ऑक्टोबर ते मार्चदरम्यान भटकंतीसाठी हवामान तुलनेने अनुकूल असते. मात्र, पावसाळ्यात ट्रेक करताना निसरड्या वाटा आणि पाण्याच्या प्रवाहांबाबत विशेष काळजी घ्या.
Chorawane Village Konkan Tourism
Sakal
Old Name of China
Sakal