सूरज यादव
कोकणसह गोव्यात होळीनंतर मोठ्या प्रमाणावर शिमगोत्सव साजरा केला जातो. या सणावेळी प्रत्येक भागानुसार वेगळ्या परंपरानुसार उत्सवाचं आयोजन करण्यात येतं.
Shimgotsav In Goa
Esakal
गोव्यातल्या सत्तारी तालुक्यात झरमे, करंझोल या गावांमध्ये चोरोत्सव हा शिमगोत्सवातला महत्त्वाचा असा उत्सव उत्साहात साजरा होतो.
Shimgotsav In Goa
Esakal
झरमे, करंझोळ गावच्या चोरोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. चोरोत्सवात प्रतिकात्मकरित्या सुळावर चढवणं, जमिनीत गाडून घेणं असे थरारक प्रकार असतात.
Shimgotsav In Goa
Esakal
चोरोत्सवात काही गावकरी चोराची वेशभुषा करतात, चोरीचं नाटक करतात. त्यानंतर त्यांना जिवंत गाडण्याचा विधी करण्यात येतो.
Shimgotsav In Goa
Esakal
गावकऱ्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून हा चोरोत्सव साजरा करण्यात येतो. ८ गावकरी चोर बनतात त्यातील चौघांची डोकी तर चौघांचे शरीर जमिनीत गाडलं जातं.
Shimgotsav In Goa
Esakal
शिमगोत्सवात पहिल्या दिवशी होळीनंतर रोमटामेळ खेळ होतो. तर सातव्या दिवशी चोरोत्सवानंतर करवल्या उत्सव साजरा करण्यात येतो.
Shimgotsav In Goa
Esakal
झरमे गावात आलेल्या काही लोकांना चोर समजून मारण्यात आलं होतं. जेव्हा गावकऱ्यांना चूक समजली तेव्हा त्यांनी प्रायश्चित्त म्हणून स्वत:ला गाडून घेतलं होतं अशी दंतकथा आहे.
Shimgotsav In Goa
Esakal
गोव्यात होळीनंतर वेगवेगळ्या भागात शिमगोत्सव साजरा होतो. भागानुसार तिथल्या प्रथा परंपरा जपत अनोख्या पद्धतीने सोहळ्यांचे आयोजन होते.
Shimgotsav In Goa
Esakal
Singapore
Esakal