Singapore : एक शहरच आहे देश! ना कोणतं राज्य, ना प्रांत; आकाराने दिल्लीपेक्षा लहान

सूरज यादव

क्षेत्रफळ

सिंगापूर हा देश असा आहे जो एक शहर आहे. याला सिटी स्टेटच्या नावानेच ओळखलं जातं. दिल्लीपेक्षा आकाराने लहान असलेल्या देशाचं क्षेत्रफळ ७५० चौरस किमी पेक्षा कमी आहे.

Singapore

राज्य नाही

केंद्र सरकारच्या अंतर्गत एक शहर म्हणूनच याठिकाणी कामकाज चालतं. इथं कोणतंही राज्य किंवा प्रांत नाही.

Singapore

ग्लोबल ट्रेड सेंटर

सिंगापूरच्या दोन बाजूला मलेशिया आणि इंडोनेशिया आहे. हिंदी महासागरातून दक्षिण चीन समुद्रापर्यंत प्रमुख समुद्री मार्गांना जोडत असल्यानं एक ग्लोबल ट्रेड सेंटर बनले आहे.

Singapore

श्रीमंत देश

सिंगापूर जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. इथला इथं दरडोई जीडीपी जास्त आहे.

Singapore

बंदर

सिंगापूरमधील बंदर हे जगातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक असून चांगी विमानतळ हे टॉप विमानतळांमध्ये गणलं जातं.

Singapore

शहर ते राष्ट्र

९ ऑगस्ट १९६५ रोजी मलेशियापासून वेगळं होत सिंगापूर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. स्वातंत्र्यानंतर सिंगापूर शहर एका समृद्ध राष्ट्रात बदललं.

Singapore

नावाचा अर्थ

सिंगापूर नावाचा अर्थ सिंगा म्हणजे सिंह आणि पुरा म्हणजे शहर असा आहे. अख्यायिकेनुसार एका राजकुमाराला इथं येताच सिंह दिसला आणि त्यानंतर हे नाव पडलं.

Singapore

कठोर कायदे

सिंगापूरचे कायदे कठोर असून कचरा फेकल्यास, थुंकल्यास किंवा तोडफोड केल्यास मोठा दंड ठोठावला जातो. यामुळे सार्वजनिक ठिकाणे इथं स्वच्छ दिसतात.

Singapore

शेतमजुरी ते पोलीस अधिकारी, नंतर उभा केलं ड्रग्ज तस्करीचं साम्राज्य; ड्रग लॉर्ड EL Mencho कोण?

el mencho drug cartel mexico

|

Esakal

इथं क्लिक करा