Monika Shinde
क्रोनिक व्हेनस इन्सफिशिएन्सी (CVI) म्हणजे पायातील शिरांमधील रक्त योग्य प्रकारे हृदयाकडे परत जात नाही, त्यामुळे सूज, वेदना आणि त्वचेचे बदल होतात.
पाय किंवा टाचेमध्ये दिवसाच्या शेवटी सूज येणे हे CVI चे सुरुवातीचे महत्त्वाचे लक्षण आहे.
पायामध्ये सतत जडपणा, थकवा जाणवतो, विशेषतः बराच वेळ उभं राहिल्यावर किंवा चालल्यानंतर.
रात्री झोपताना पायात सतत झिणझिण्या येणे ही लक्षणं दिसू शकतात.
पायांच्या त्वचेवर गडद तपकिरी रंग दिसू लागतो किंवा त्वचा कोरडी होते.
लहान जखमा बऱ्या न होणे, त्वचेवर खरूज येणे, हेदेखील CVI ची चिन्हं आहेत.
पायातील सूज, वेदना किंवा त्वचेतील बदल दिसले की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.