Monika Shinde
डाळिंब ज्यूस केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. रोज एक ग्लास घेतल्यास शरीरात होतात हे सकारात्मक बदल.
डाळिंब ज्यूसमुळे रक्तातील लोहाची मात्रा वाढते आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे संरक्षण करतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
डाळिंब ज्यूस त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकतो. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि नितळ दिसते.
डाळिंबातील फायबर्स आणि अॅसिड्स पचनक्रिया सुधारतात. अन्न सहजपणे पचते.
डाळिंबात असलेले ‘व्हिटॅमिन C’ आणि अँटीऑक्सिडंट्स इम्युनिटी मजबूत करतात, त्यामुळे सर्दी-खोकला दूर राहतो.
डाळिंब ज्यूस शरीरात ऊर्जा निर्माण करतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.