Aarti Badade
चुलीवर मंद आचेवर शिजलेला आणि भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध असलेला हा मटण रस्सा कोणत्याही हॉटेलच्या चवीला मागे टाकेल.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
यासाठी १.५ किलो मटण, भाजण्यासाठी कांदे-खोबरं, आले-लसूण पेस्ट, कोल्हापुरी तिखट आणि गरम मसाले तयार ठेवा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
स्वच्छ धुतलेल्या मटणाला हळद आणि मीठ लावून मुरत ठेवा, ज्यामुळे मटण चविष्ट आणि मऊ शिजण्यास मदत होईल.
Authentic Gavran Mutton Rassa
sakal
पातेल्यात तेल गरम करून कांदा परता आणि त्यावर मटण ठेवून झाकण ठेवा; झाकणावरचे गरम पाणी मटणात घालून ते मऊ शिजेपर्यंत शिजवा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
कांदा आणि सुकं खोबरं थेट चुलीच्या आगीत भाजून घ्या, यामुळे रस्स्याला अस्सल गावरान 'स्मोकी' चव येते.
Authentic Gavran Mutton Rassa
sakal
भाजलेला कांदा-खोबरं, जिरे, धने आणि आले-लसूण एकत्र वाटून घ्या; पाट्यावर वाटल्यास चव अधिकच अप्रतिम लागते. हवे असल्यास टोमॅटोही वाटून घ्या.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
तेलात खडे मसाले थोडी आल लसूण पेस्ट आणि लाल तिखट टाकून परतून घ्या. लगेच त्यावर तयार वाटण टाकून परता, ज्यामुळे रस्स्याला छान लालभडक रंग आणि तरी येते.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात मटण मसाला आणि शिजवलेले मटण घालून आवश्यकतेनुसार कोमट पाणी मिसळा.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
हा रस्सा चुलीवर मंद आचेवर चांगला उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा अर्क मटणामध्ये पूर्णपणे उतरेल.
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा आणि हा झणझणीत रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीसह आस्वाद घ्या!
Authentic Gavran Mutton Rassa
Sakal
Peri Peri Chicken Momos
Sakal