वाढते वजन थांबवायचंय? स्वयंपाकघरातील 'ही' गोष्ट चरबी वितळवण्यात ठरेल रामबाण!

सकाळ डिजिटल टीम

वाढलेलं वजन नियंत्रणात आणायचंय?

वाढते वजन ही फक्त दिसण्याची समस्या नाही, तर ती अनेक गंभीर आजारांची सुरुवात असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ व्यायामच नव्हे, तर आहारावरही लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

Cinnamon for Weight Loss | esakal

घरच्या घरी 'दालचिनी'ने कमी करा चरबी

यासाठी तुम्हाला फारसं बाहेरून काही आणायची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातच एक असा पदार्थ आहे, जो वजन कमी करण्यात मदत करू शकतो. तो म्हणजे दालचिनी!

Cinnamon for Weight Loss | esakal

वजन कमी होण्याचा अचूक फॉर्म्युला

आपल्यापैकी अनेकांना वाटतं की दालचिनी फक्त चहा, पोहे किंवा बिर्याणीची चव वाढवण्यासाठी वापरली जाते; पण प्रत्यक्षात दालचिनी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून ती वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.

Cinnamon for Weight Loss | esakal

वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा कसा वापर करावा?

दालचिनीचं पाणी : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात दालचिनी उकळून पिल्यास चयापचय वेगाने होतो आणि चरबी वितळण्यास मदत होते.

दालचिनीचा चहा : दररोज दालचिनीचा चहा घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पाचनसंस्थाही मजबूत होते.

दालचिनी + मध : रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात दालचिनी पावडर आणि मध एकत्र करून घेतल्यास शरीरातील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Cinnamon for Weight Loss | esakal

दालचिनीचे आरोग्यदायी फायदे

मधुमेह नियंत्रण : दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ती मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.

हृदय आरोग्यासाठी लाभदायक : दालचिनीमधील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे संरक्षण करतात.

चयापचय वाढवते : शरीरातील चरबी जलद वितळवण्यासाठी चयापचय वेगवान असणे आवश्यक आहे. दालचिनी या प्रक्रियेला चालना देते.

Cinnamon for Weight Loss | esakal

ही चविष्ट गोष्ट खूप फायदेशीर ठरेल

वजन कमी करायचं असेल, तर व्यायामासोबतच आहारातील साध्या घटकांकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. दालचिनी हा असा घटक आहे, जो तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयोगी पडतो.

Cinnamon for Weight Loss | esakal

उलटीमध्ये रक्त दिसतंय? वजन झपाट्यानं कमी होतंय? थकल्यासारखं वाटतंय? ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरची असू शकतात! वेळीच सावध व्हा

Stomach Cancer Symptoms | esakal
येथे क्लिक करा..