उलटीमध्ये रक्त दिसतंय? वजन झपाट्यानं कमी होतंय? थकल्यासारखं वाटतंय? ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरची असू शकतात! वेळीच सावध व्हा

सकाळ डिजिटल टीम

...तर कॅन्सर जीवघेणा ठरू शकतो

कर्करोग हे आजाराचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. सध्या लोकांच्या असंतुलित जीवनशैली, फास्ट फूडची सवय, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावामुळे कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

Stomach Cancer Symptoms | esakal

पोटाच्या कॅन्सरची ५ संभाव्य लक्षणं

पोटाचा कॅन्सर (Stomach Cancer) हा त्यापैकी एक प्रकार आहे, जो सुरुवातीला फारसा धोकादायक वाटत नाही, पण वेळीच लक्ष न दिल्यास जीवावर बेतू शकतो. म्हणूनच, या आजाराची लक्षणं लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे.

Stomach Cancer Symptoms | esakal

खाल्ल्यानंतर मळमळ आणि उलटी होणं

प्रत्येक जेवणानंतर मळमळ होणं, उलटी होणं हे केवळ पचनाच्या त्रासामुळे होतं असं नाही. पोटात पेशींच्या असामान्य वाढीमुळेही हे लक्षण दिसून येऊ शकतं. विशेषतः वारंवार अशा तक्रारी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

Stomach Cancer Symptoms | esakal

वजन झपाट्याने कमी होणं (डायटशिवाय)

तुम्ही डायट किंवा एक्सरसाईज न करता वजन वेगानं कमी होत असेल, तर तो इशारा कर्करोगाच्या वाढीचा असू शकतो. शरीरातील पेशींमध्ये वाढ होणं आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणं, हे यामागे कारणीभूत ठरू शकतं.

Stomach Cancer Symptoms | esakal

सतत पोट फुगणं आणि अ‍ॅसिडिटी

थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं, सतत गॅस तयार होणं, अ‍ॅसिडिटी, अपचन होणं यासारखी लक्षणं आपल्याला सुरुवातीला सामान्य वाटतात; पण हाच त्रास काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत सुरू राहिल्यास पोटाच्या आत काहीतरी गंभीर बिघाड असू शकतो.

Stomach Cancer Symptoms | esakal

उलटीमध्ये रक्त दिसणं

हे लक्षण अत्यंत गंभीर मानले जाते. उलटी करताना जर रक्त दिसलं, तर वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. हे लक्षण पोटाच्या आतील भागात जखम किंवा कॅन्सरच्या उपस्थितीचा गंभीर इशारा असतो.

Stomach Cancer Symptoms | esakal

थकवा आणि शारीरिक कमजोरी

दिवसभर ऊर्जा कमी वाटणं, थकवा जाणवणं, शरीरात काम करण्याची क्षमता कमी होणं ही लक्षणं अनेकदा कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर दिसतात. ही लक्षणं तुमच्या शरीरातील गंभीर अडचणींचा संकेत देत असू शकतात.

Stomach Cancer Symptoms | esakal

आठवड्यातून फक्त एकदाच खा 'ही' भाजी! ब्लड शुगर नियंत्रणात राहील अन् हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा होईल दूर

Spiny Gourd Benefits | esakal
येथे क्लिक करा...