एखाद्या शहराचे नाव बदलले तर तिथल्या जुन्या कागदपत्रांचे काय होतं?

Varsha Balhe

शहराचं नाव बदललं की काय होतं?

एखाद्या शहराचं नाव बदललं की तिथल्या नागरिकांच्या जुन्या कागदपत्रांचं काय होतं? आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा, घराचे खरेदीखत किंवा शाळेचे दाखले पुन्हा काढावे लागतात का? अनेकांना हा प्रश्न पडतो.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

प्रक्रिया

एखाद्या शहराचं नाव बदलण्याची सरकारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत अधिकृत राजपत्र प्रसिद्ध केलं जातं. यामुळे जुन्या नावाऐवजी नवीन नाव सरकारी नोंदींमध्ये वापरलं जाऊ लागतं. मात्र, जुन्या नावाने तयार झालेली कागदपत्रं केवळ नाव बदलल्यामुळे अवैध ठरत नाहीत.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

कागदपत्रांचं काय?

महाराष्ट्रात औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं. त्यामुळे या शहरांतील नागरिकांच्या जुन्या कागदपत्रांवर अजूनही औरंगाबाद किंवा उस्मानाबाद असं नाव दिसू शकतं. मात्र, केवळ या कारणामुळे ती कागदपत्रं बदलण्याची गरज नसते.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

सातबारा

समजा, तुमच्या घराच्या खरेदीखतावर किंवा सातबारा उताऱ्यावर शहराचं जुनं नाव आहे. तर केवळ शहराचं नाव बदलल्यामुळे तुमच्या मालकी हक्कावर परिणाम होत नाही. जुन्या कागदपत्रांचा पुरावा म्हणून वापर करता येतो. नवीन नोंदी किंवा उतारे काढताना संबंधित सरकारी यंत्रणेनुसार नवीन नाव दिसू शकतं.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

आधार आणि पॅन कार्ड

शहराचं नाव बदललं म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पुन्हा काढण्याची सक्ती नसते. जुन्या नावाचा पत्ता असलेली कागदपत्रं केवळ शहराचं नाव बदलल्यामुळे रद्द होत नाहीत. मात्र, पत्ता अपडेट करताना संबंधित विभागाच्या नियमांनुसार नवीन नाव नोंदवता येतं.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

दाखले

शाळा सोडल्याचा दाखला, पदवी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यावर जुन्या शहराचं नाव असलं तरी ते बदलण्याची गरज नसते. कारण ही कागदपत्रं संबंधित घटना घडली त्या वेळच्या नोंदींनुसार तयार झालेली असतात. त्यामुळे शहराचं नाव बदललं म्हणून त्यांची वैधता संपत नाही.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

बँक खाते आणि विमा पॉलिसी

शहराचं नाव बदलल्यामुळे बँक खाते, पासबुक, चेकबुक किंवा विमा पॉलिसी बंद होत नाही. मात्र, केवायसी किंवा पत्त्याची माहिती अपडेट करताना नवीन नाव वापरण्याबाबत संबंधित बँक किंवा संस्थेकडून माहिती घेता येते.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

नवीन नाव

नाही. केवळ शहराचं नाव बदललं म्हणून प्रत्येक नागरिकाला आपली सर्व कागदपत्रं बदलण्याची गरज नसते. जुन्या नावाची कागदपत्रं जपून ठेवता येतात. नवीन कागदपत्रं काढताना किंवा पत्ता अपडेट करताना संबंधित सरकारी विभागाच्या नियमांनुसार नवीन नाव वापरता येतं.

What Happens to Old Documents After a City Name Change?

|

esakal

महाराष्ट्रात माणूस पहिल्यांदा कधी राहायला आला?

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

येथे क्लिक करा