महाराष्ट्रात माणूस पहिल्यांदा कधी राहायला आला?

Varsha Balhe

महाराष्ट्र

महाराष्ट्रात माणूस पहिल्यांदा कधी आला, तो कुठे राहत होता आणि त्याचं जीवन कसं होतं? आज ज्या महाराष्ट्रात मोठमोठी शहरं आणि गावं आहेत, तिथे हजारो नव्हे तर लाखो वर्षांपूर्वी माणसाचं अस्तित्व होतं. याचे पुरावे आजही महाराष्ट्रातील काही ठिकाणी सापडतात.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

पुरातत्त्वीय

पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार, महाराष्ट्रात मानवाचं अस्तित्व सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी असल्याचं मानलं जातं. हा काळ आद्य पुराश्मयुगाचा होता. त्यावेळी माणूस आजच्यासारख्या घरांमध्ये राहत नव्हता, तर निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करत होता.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

पुणे

पुणे जिल्ह्यातील बोरी गावाजवळ दगडांपासून तयार केलेली प्राचीन हत्यारं सापडली आहेत. या हत्यारांवरून त्या काळात या भागात मानवाचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळतात. बोरी हे महाराष्ट्रातील प्राचीन मानवी अस्तित्वाच्या अभ्यासातील महत्त्वाचं ठिकाण आहे.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

नदी

त्या काळात माणूस एका ठिकाणी स्थिर राहत नव्हता. अन्न आणि पाण्याच्या शोधात तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. नद्यांच्या काठावर पाणी आणि अन्न सहज मिळत असल्याने माणसाचा मुक्काम अशा भागांमध्ये असायचा.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

आदिमानव

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे ठिकाणही प्राचीन मानवी इतिहासासाठी महत्त्वाचं आहे. प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या या परिसरात दगडी हत्यारं सापडली आहेत. या हत्यारांमधून त्या काळातील माणसाच्या जीवनशैलीची माहिती मिळते.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

आयुष्य

मध्याश्मयुगात हवामानात बदल झाले. जंगलं वाढली आणि माणूस लहान आकाराची, सुबक दगडी हत्यारं वापरू लागला. जळगाव जिल्ह्यातील पाटणे, रायगडमधील पाचाड आणि रत्नागिरीतील हातखंबा येथे या काळातील मानवी अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

गावं

हजारो वर्षांच्या प्रवासानंतर माणसाच्या जीवनात मोठा बदल झाला. शेती आणि पशुपालनाला सुरुवात झाली. त्यामुळे सतत भटकंती करण्याऐवजी माणूस एकाच ठिकाणी राहू लागला. महाराष्ट्रात ताम्रपाषाण युगात स्थायी स्वरूपाच्या वसाहती विकसित झाल्या.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

प्राचीन

धुळे जिल्ह्यातील सावळदा, अहिल्यानगर जिल्ह्यातील दायमाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इनामगाव ही ताम्रपाषाण युगातील महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळं आहेत. या ठिकाणी घरांचे अवशेष, धान्य साठवण्याची भांडी आणि तांब्याची अवजारं सापडली आहेत.

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

इतिहास

महाराष्ट्रात मानवाचं अस्तित्व सुमारे १४ लाख वर्षांपूर्वीपासून असल्याचे पुरावे मिळतात. मात्र, आजच्या अर्थाने गावं वसवून स्थिर राहण्याची सुरुवात त्यानंतर हजारो वर्षांनी झाली. म्हणजेच महाराष्ट्राचा मानवी इतिहास लाखो वर्षांचा आहे!

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

१० हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात माणसं कशी राहत होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Human Life in Maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा