Monika Shinde
तुमचं ही रोज सकाळी पोट साफ न झाल्याने दिवस भर अस्वस्थ होते का? मग रोज घरच्या घरी या पदार्थाचा सेवन करा आणि फरक अनुभवा.
रोज सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून प्या. पचनसंस्था साफ होण्यास मदत होते.
रात्री पाण्यात भिजवलेले ५-६ मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे मलावष्टंभ (गॅस ) दूर राहतो.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घेणे फायदेशीर. सकाळी पोट साफ होते.
एक छोटा तुकडा गूळ गरम पाण्यात मिसळून पिल्यास पाचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ राहते.
ओव्याची पूड आणि सैंधव मीठ गरम पाण्यासोबत घ्या. पोटदुखी, गॅस, वायू कमी होतो आणि बद्धकोष्ठता दूर होते.