फक्त एक नाही, घरी बनवा ढोकळ्याचे हे ८ वेगवेगळे स्वादिष्ट प्रकार!

Monika Shinde

ढोकळा

ढोकळा हा फक्त नाश्ता नसून, एक आरोग्यदायी, झटपट व चवदार पर्याय आहे. विविध प्रकारच्या धान्यांपासून आणि भाज्यांपासून तयार होणारे हे ढोकळे खवय्यांसाठी नेहमीच आवडते असतात. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे जे तुम्ही सहज घरी बनवू शकता.

Dhokla | Esakal

खमण ढोकळा

हरभऱ्याच्या पिठापासून (बेसन) बनवलेला खमण ढोकळा हलका, मऊ आणि थोडा आंबटसर असतो. तो वाफवून तयार केला जातो, आणि नंतर त्यावर मोहरी व हिरव्या मिरच्या फोडणी दिली जाते. कोथिंबीर आणि खोबरं घालून सजवला जातो.

Khaman Dhokla | Esakal

रवा ढोकळा

रवा (सूजी) वापरून बनवलेला हा झटपट ढोकळा आंबवण्याची गरज नसते. तो हलका, फसफसता असतो आणि दही व सोड्यामुळे लगेच फुगतो, म्हणूनच तो झटपट नाश्त्यासाठी योग्य पर्याय आहे.

Rava Dhokla | Esakal

खट्टा ढोकळा

तांदूळ आणि उडीद डाळीच्या आंबवलेल्या पिठापासून बनणारा हा ढोकळा अधिक आंबट चव असलेला असतो. हा पांढऱ्या रंगाचा ढोकळा हिरव्या चटणीसह व मोहरी फोडणीसह दिला जातो.

Khatta Dhokla | Esakal

गाजर ढोकळा

गाजर किसून त्याचे पीठात मिश्रण करून बनवलेला गाजर ढोकळा पौष्टिकतेने भरलेला असतो. त्याचा गोडसर चव व रंग मुलांना खूप आवडतो.

Peel the carrot | Esakal

भाताचा ढोकळा

उरलेला भात वापरून बनवलेला हा ढोकळा म्हणजे अन्नाचा पुनर्वापर करत केलेली एक स्वादिष्ट कल्पना. थोडं बेसन, दही घालून मऊसर व हलका ढोकळा तयार होतो.

Rice dumpling | Esakal

सँडविच ढोकळा

या ढोकळ्याचे दोन थर असतात. पांढरा (खट्टा ढोकळा) आणि पिवळा (खमण ढोकळा). मधे एखादी चटणी लावून त्याचे थर तयार केल्याने तो चविष्ट आणि देखणे दिसतो. पार्टीसाठी व सणांसाठी योग्य पर्याय.

Sandwich Dhokla | Esakal

बीटरूट ढोकळा

बीटरूटचा रस वापरून बनवलेला हा ढोकळा लालसर व उठावदार रंगाचा असतो. यामुळे पोषणमूल्ये वाढतात आणि चवही थोडीशी गोडसर लागते. आरोग्यपूर्ण आणि आकर्षक पर्याय.

Beetroot Dhokla | Esakal

स्लिप डिस्कची सुरुवातीची लक्षणे कोणती?

येथे क्लिक करा