Puja Bonkile
संत्र्याची साल खाल्ल्यानंतर फेकून देण्याएवजी त्याचा घरगुती कामांसाठी वापर करू शकता.
संत्र्याची साल वापरून सिंक स्वच्छ करू शकता. यासाठी संत्र्याची साल पाण्यात उकळावे आणि सिंकमध्ये टाकून स्क्रबरने स्वच्छ करावे.
घरातील स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी संत्र्याची साल वापरू शकता. यासाठी एका भांड्या संत्र्याची साल टाकून उकळा आणि त्या पाण्यात भांडी ठेवा. नंतर स्क्रबरने स्वच्छ करा.
तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करून लोखंडी तवा स्वच्छ करू शकता. यासाठी संत्र्याच्या सालीचे पाणी, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून तवा स्वच्छ करू शकता.
तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर चमकदार त्वचेसाठी देखील करू शकता. यासाठी दुधामध्ये संत्र्याच्या सालीची वापडर मिक्स करून चेहऱ्यावर लावावी.