Aarti Badade
प्रदूषण, धूळ आणि अतिरिक्त तेलामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्याला 'पोर ब्लॉकेज' म्हणतात. यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स वाढू लागतात.
Clogged pores treatment at home
Sakal
त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःला रिपेअर करते, पण जेव्हा मृत पेशी (Dead Cells) स्वच्छ केल्या जात नाहीत, तेव्हा त्या छिद्रांमध्ये अडकतात. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.
Clogged pores treatment at home
Sakal
दिवसातून किमान दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाते.
Clogged pores treatment at home
Sakal
आठवड्यातून १ ते २ वेळा हलके स्क्रबिंग किंवा एक्सफोलिएशन करा. यामुळे मृत त्वचा पेशी दूर होतात आणि छिद्रे मोकळी राहतात. मात्र, जास्त स्क्रबिंग टाळावे.
Clogged pores treatment at home
Sakal
त्वचेसाठी नेहमी “नॉन-कॉमेडोजेनिक” (Non-Comedogenic) उत्पादने वापरा. ही उत्पादने छिद्रे बंद करत नाहीत. जड आणि तेलकट क्रीम्सऐवजी जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
Clogged pores treatment at home
Sakal
रात्री मेकअप न काढता झोपणे त्वचेसाठी सर्वात घातक ठरते. यामुळे रसायने छिद्रांमध्ये खोलवर जातात. झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे ही सुंदर त्वचेची गुरुकिल्ली आहे.
Clogged pores treatment at home
Sakal
जास्त तेलकट आणि जंक फूड टाळून आहारात फळे व भाज्यांचा समावेश करा. भरपूर पाणी प्या आणि पुरेसी झोप घ्या, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ आणि तजेलदार राहील.
Clogged pores treatment at home
Sakal
Kidney damage foods
Sakal