वातावरणातील बदलामुळे झोपेवर परिणाम का होतो?

Aarti Badade

वाढत्या उष्णतेचा झोपेवर परिणाम

हवामान बदल आणि वाढते तापमान यामुळे रात्रीची झोप मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. उष्ण रात्रीमुळे शांत आणि पुरेशी झोप घेणे कठीण होत आहे.

sleep 

|

Sakal

वर्षाला ५६ तास झोप कमी

अभ्यासानुसार, जगभरात वाढत्या तापमानामुळे प्रत्येक व्यक्तीची सरासरी वर्षाला सुमारे ५६ तासांची झोप कमी होत आहे.

sleep 

|

Sakal

भारतात अधिक गंभीर परिस्थिती

भारतातील दक्षिण आणि किनारपट्टी भागातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसत असून, काही शहरांमध्ये वर्षाला ९० तासांहून अधिक झोप कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

sleep 

|

Sakal

सर्वाधिक प्रभावित शहरे

चेन्नई, नेल्लोर, पुद्दुचेरी, कोची, कोझिकोडे, तिरुचिरापल्ली आणि गुंटूर या शहरांमध्ये वाढत्या उष्ण रात्रीमुळे झोपेचे नुकसान अधिक होत आहे.

sleep 

|

Sakal

मुंबई विरुद्ध श्रीनगर

मुंबईमध्ये सरासरी ८४ तास, तर विशाखापट्टणममध्ये ८७ तास झोप कमी झाल्याची नोंद आहे. याउलट, श्रीनगरसारख्या थंड शहरात हा परिणाम तुलनेने कमी आहे.

sleep 

|

Sakal

झोप का कमी होते?

रात्रीचे किमान तापमान सातत्याने वाढत असल्याने शरीराला थंडावणे कठीण जाते. त्यामुळे गाढ झोप लागत नाही आणि झोपेची गुणवत्ता खालावते.

sleep 

|

Sakal

निरोगी झोपेसाठी काय कराल?

झोपण्यापूर्वी खोली थंड आणि हवेशीर ठेवा. पुरेसे पाणी प्या आणि हलका आहार घ्या.झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर कमी करा. नियमित वेळेत झोपण्याची सवय लावा.

sleep 

|

Sakal

कोरडी त्वचा होईल हायड्रेटेड! घरच्या घरी बनवा DIY फेस शीट मास्क

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

येथे क्लिक करा