कोरडी त्वचा होईल हायड्रेटेड! घरच्या घरी बनवा DIY फेस शीट मास्क

Aarti Badade

महागड्या प्रॉडक्टची गरज नाही

महागडे फेस मास्क किंवा स्किन ट्रीटमेंट न करता, फक्त टिश्यू पेपर आणि काही घरगुती पदार्थांच्या मदतीने त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळवू शकता.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

लागणारे साहित्य

साधा टिश्यू पेपर / पेपर नॅपकिन,तांदळाचे पाणी,कोरफड जेल,१ चमचा मध

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

शीट मास्क कसा तयार कराल?

एका वाटीत तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि मध एकत्र मिसळा. त्यामध्ये टिश्यू पेपर पूर्णपणे भिजवून फेस शीट मास्क तयार करा.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

वापरण्याची योग्य पद्धत

भिजवलेला टिश्यू चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. टिश्यू कोरडा झाल्यावर तो काढून उरलेले मिश्रण त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

तांदळाच्या पाण्याचे फायदे

तांदळाच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिड्स त्वचेला हायड्रेट ठेवतात, निस्तेजपणा कमी करतात आणि नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करतात.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

मध आणि कोरफडीचे फायदे

मध त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझेशन देतो, तर कोरफड जेल त्वचेतील जळजळ कमी करून त्वचेला थंडावा आणि मऊपणा देते.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

महत्त्वाची टीप

हा घरगुती उपाय त्वचा हायड्रेट आणि तजेलदार ठेवण्यास मदत करू शकतो. मात्र संवेदनशील त्वचा असल्यास किंवा कोणतीही अॅलर्जी असल्यास वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

Natural Sheet Mask for Hydrated & Glowing Skin

|

Sakal

रताळी की बटाटा? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?

Sweet Potato vs Potato

|

Sakal

येथे क्लिक करा