Yashwant Kshirsagar
रात्री झोपताना आपले शरीर हिलिंग मोडवर असते. झोपण्याआधी आपण जर लवंग सारखा आयुर्वेदिक पदार्थ खाल्ला तर अनेक फायदे होतात
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दोन लंवगा उकळून प्यायले तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
लवंगमध्ये युजेनॉल नावाचे योगिक असते ज्यामध्ये अॅंटी इम्फ्लेमेटरी, अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी ऑक्सिडेंट गुण असतात.
लवंगेचे पाणी प्यायलाने व्हिटामिन सी, व्हिटामिन के, ई, आणि अन्य आवश्यक शरीरातील खनिजांची कमतरता दूर होते.
लंवगेच्या पाण्यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर होते, पोटातील गॅस, आणि सुजेपासून पण दिलासा मिळतो.
लवंगमध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात, हे पाणी प्यायल्याने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
इम्युनिटी वाढवण्यासाठी लवंगेचे पाणी खूप फायदेशीर आहे.
( सूचना : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, सकाळ याची पुष्टि करत नाही. )