पिगमेंटेशन, मुरुमं आणि डागांवर लवंग पाण्याचा रामबाण उपाय!

Monika Shinde

लवंग पाणी

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी रसायनयुक्त प्रॉडक्ट्स नाही, तर घरगुती उपाय वापराच. लवंग पाणी हे त्वचेसाठी एक शक्तिशाली नैसर्गिक टॉनिक आहे.

लवंग पाण्याचं महत्त्व काय?

लवंगात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला स्वच्छ, मृदू व तेजस्वी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

लवंग पाणी बनवायची पद्धत

एका ग्लास पाण्यात 1 टेबलस्पून लवंग टाका. 10-15 मिनिटे उकळा. थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

या मिश्रणात काय टाकाल?

लवंग पाण्यात 1 चमचा रोज वॉटर, अ‍ॅलोव्हेरा जेल, आणि 4-5 थेंब टी ट्री ऑईल मिसळा. हे मिश्रण चांगलं हलवा.

वापरण्याची योग्य पद्धत

दिवसातून 2-3 वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यावरच वापरा. डोळ्यांत न जाण्याची काळजी घ्या.

फायदे काय आहेत?

पिगमेंटेशन कमी होतं, मुरुमं नियंत्रणात राहतात, त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. लवंग पाणी त्वचेचा टोन सुधारणं देखील शक्य करतं.

काळजी व सूचना

सेंसिटिव त्वचेसाठी पॅच टेस्ट करा. 7-10 दिवसांत वापरून नवीन मिश्रण तयार करा. परिणाम हळूहळू दिसतील, नियमितता ठेवा.

दिवाळीनंतर शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

येथे क्लिक करा