Udayanraje Bhosale : CM शिंदेंनी उदयनराजेंना दिली तलवार भेट; मंत्री देसाईंचा राजेंना मिश्‍कील सल्ला

सकाळ डिजिटल टीम

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने साताऱ्यात आले होते. या वेळी जलमंदिर पॅलेस येथे मुख्यमंत्र्यांचे शाही थाटात स्वागत करण्यात आले.

Udayanraje Bhosale Birthday

यानंतर मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना तलवार भेट दिली. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी त्यांना महाराज साहेब ही मुख्यमंत्र्यांची तलवार आहे, ही संग्रही जपून ठेवा, असा सल्ला दिला.

Udayanraje Bhosale Birthday

खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल दुपारी उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने साताऱ्यात दाखल झाले.

Udayanraje Bhosale Birthday

मुख्यमंत्र्यांनी जलमंदिर पॅलेस या उदयनराजेंच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

Udayanraje Bhosale Birthday

तसेच भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासदार उदयनराजेंना पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, कंदी पेढे व तलवार भेट दिली. उदयनराजेंनी ही तलवार हवेत उंचावल्यानंतर एकच जल्लोष झाला.

Udayanraje Bhosale Birthday

यावर पालकमंत्री देसाई यांनी मात्र, त्यांना महाराज साहेब ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली तलवार आहे. जपून ठेवा, संग्रही ठेवा, असे म्हणून हसले. यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात आला. (फोटो : प्रमोद इंगळे)

Udayanraje Bhosale Birthday

Amba Ghat : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबा घाट भकास; पाहा PHOTO