Yashwant Kshirsagar
नारळपाणी आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.
नारळतील पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास आणि पचनात सुधारणा होण्यास खूप मदत होते.
नारळ पाण्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात.
यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम इत्यादी महत्वाचे इलेक्ट्रोलाईट्स असतात
पण बऱ्याचवेळा नारळ खरेदी केल्यानंतर त्यात खूप कमी पाणी असल्याचे समोर येते.
नारळात पाणी कमी निघल्याने लोक निराश होतात
पण नारळात पाणी कमी आहे की जास्त हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे ज्यामुळे तुमची निराशा होणार नाही.
जो नारळ हिरवा असतो त्यात जास्त पाणी असते, असे म्हटले जाते.
नारळाचा रंग जर तांबूस असेल तर त्यात पाणी कमी असते.