Aarti Badade
विड्याची पानं सर्दीवर घरगुती आणि नैसर्गिक उपचार आहे.
बदलत्या हवामानामुळे, संसर्गामुळे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी होते.
दोन-चार विड्याची पानं चावून खाल्ल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.
ताप किंवा सर्दीसारखी लक्षणं सतत जाणवत असतील तर विड्याची पानं खाणे फायदेशीर ठरते.
विड्याची पानं खाल्ल्याने छातीत जमलेला कफ कमी होतो आणि फुफ्फुसं मजबूत होतात.
गरम पाण्यात विड्याचं पान, लवंग आणि वेलदोडा टाकून उकळा. यामुळे श्वासाच्या अडचणीवर आराम मिळतो.
हे औषधी पाणी अर्धं होईपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर ते थंड झाल्यावर प्या.
हा उपाय दिवसातून एकदा किंवा दोनदा करावा. नियमितपणे केल्यास नक्कीच फायदा होतो.
घरी उपाय करत असताना लक्षणं गंभीर वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.