Aarti Badade
व्हिटॅमिन डीची कमतरता अनेक कारणांनी होऊ शकते. सूर्यप्रकाशाशिवाय इतर ५ कारणं जाणून घ्या.
तुम्ही पूरक आहार घेत असलात तरी, शरीरात जर शोषण क्षमता कमी असेल, तर व्हिटॅमिन डीची कमतरता राहते.
व्हिटॅमिन डी शोषण्यासाठी चरबी लागते. आतड्यांचे आरोग्य बिघडल्यास शोषणात अडथळा येतो.
स्टिरॉइड्स, एपिलेप्सीच्या औषधांनी शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊ शकते.
जास्त वजनामुळे अडकते व्हिटॅमिन डी शरीरात जास्त चरबी असल्यास व्हिटॅमिन डी साठून राहते आणि वापरता येत नाही.
यकृत आणि मूत्रपिंड नीट नसेल तर समस्या हे अवयव व्हिटॅमिन डी सक्रिय करण्यात मदत करतात. कार्य बिघडल्यास प्रभाव पडतो.
जिन्सचा प्रभाव – काहींना सूर्यप्रकाश असूनही फायदा नाही काही लोकांचे शरीर अनुवंशिकदृष्ट्या व्हिटॅमिन डी योग्य वापरू शकत नाही.
आहार, पचन, अवयवांची कार्यक्षमता आणि जीवनशैली – यांचेही खूप मोठे योगदान असते.