हिवाळ्यात सॉक्स घालूनही पाय थंड राहतायत? डॉक्टरांनी सांगितली ‘ही’ ८ कारणं

Anushka Tapshalkar

हिवाळा आणि थंड पाय

हिवाळ्यात शरीर उष्णता टिकवण्यासाठी रक्तप्रवाह मुख्य अवयवांकडे वळवतो. त्यामुळे हात-पाय थंड पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Winter and Cold Feet

|

sakal

रक्ताभिसरण कमी असणे

Peripheral artery disease, डायबेटीस किंवा Raynaud’s phenomenon मुळे पायांपर्यंत रक्त कमी पोहोचते आणि पाय थंड राहतात.

Blood Circulation

|

sakal

नर्व्ह डॅमेज (नसांचे नुकसान)

डायबेटीससारख्या आजारांमध्ये नसा कमकुवत झाल्याने तापमान नीट जाणवत नाही, त्यामुळे मोजे घालूनही पाय थंड वाटू शकतात.

Nerve Damage

|

sakal

पातळ मोजे

खूप पातळ किंवा हलके मोजे उष्णता धरून ठेवू शकत नाहीत. हिवाळ्यात लोकर किंवा थर्मल मोजे अधिक उपयुक्त ठरतात.

Thin Socks

|

sakal

ओलावा आणि घाम

घाम किंवा ओलसरपणा असल्यास उष्णता लवकर निघून जाते. विशेषतः कॉटन मोजे घाम शोषतात पण कोरडे ठेवत नाहीत.

Moisture and Sweat 

|

sakal

शरीराची तापमान नियंत्रण प्रक्रिया

थंडीत शरीर कोअर तापमान जपण्यासाठी पायांकडे कमी रक्त पाठवते, त्यामुळे पाय थंड पडतात.

Body Temperature Control Process

|

sakal

चुकीची पादत्राणे (Footwear)

खूप घट्ट किंवा हवा न जाऊ देणारे बूट रक्तप्रवाह अडवतात आणि पाय अधिक थंड करतात.

Wrong Footwear

|

Sakal

जीवनशैलीशी संबंधित कारणे

हालचाल कमी असणे, धूम्रपान आणि असंतुलित आहार यामुळे रक्ताभिसरण कमी होते आणि पाय थंड राहतात.

Lifestyle

|

sakal

इतर आरोग्य समस्या

डायबेटीस, थायरॉईड किंवा अ‍ॅनिमिया यांसारखे आजारही पाय कायम थंड राहण्याचे कारण ठरू शकतात.

Health Issues

|

sakal

थंडीतील कोरडी त्वचा अन् फुटलेले ओठ लगेच होतील टवटवीत; बेंबीत फक्त ‘हे’ तेल घाला

आणखी वाचा