Monika Shinde
तापमान घटू लागलं की शरीराची हालचाल कमी होते आणि सांधे जड होत जातात. थंडी लागली की गुडघे, कंबर आणि खांदे वेदना देऊ लागतात, त्यामुळे त्रास अचानक वाढतो.
थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह मंदावतो. सांध्यांपर्यंत उबदार रक्त कमी पोहोचल्याने stiffness वाढतो आणि वेदनांचा त्रास अधिक जाणवू लागतो.
तापमान कमी होताच स्नायू आणि लिगामेंट्स घट्ट होतात. ही कडकपणा वाढल्यामुळे सांधे सहज वाकत नाहीत आणि चालताना किंवा बसताना तीव्र वेदना जाणवते.
पूर्वीची मोच, फ्रॅक्चर किंवा ताणलेली नस हिवाळ्यात संवेदनशील होते. तापमान खाली गेल्यावर त्या जागी पुन्हा सुज, जडपणा आणि वेदना वाढू लागतात, ज्यामुळे त्रास अधिक जाणवतो.
हिवाळ्यात हवा कोरडी आणि थंड असते. ही थंडी सांध्यांतील द्रव नैसर्गिकरीत्या घटवते. द्रव कमी होताच सांधे घर्षण देतात आणि हालचाल करताना तीव्र वेदना निर्माण होते.
हिवाळ्यात लोक कमी चालतात, कमी व्यायाम करतात. शरीर स्थिर राहिलं की सांधे अधिक stiff होतात. नियमित हालचाल नसेल तर सांधेदुखी जलद वाढते आणि जडपणा जाणवतो.
गरम पॅक, गरम पाण्याची बॉटल, वूलन कपडे आणि घरातील उबदार वातावरण स्नायूंना सैल करतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सांधेदुखीत त्वरित आराम मिळतो.
हळद, आलं, ओमेगा-३, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D शरीराला आधार देतात. हलका स्ट्रेचिंग, योग आणि रोज चालणे सांधे मजबूत ठेवतात आणि हिवाळ्यातील वेदना प्रभावीपणे कमी करतात.