Yashwant Kshirsagar
'ऑपरेशन सिंदूर' नंतर कर्नल सोफिया या चर्चेत आल्या आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही खूप चर्चा होत आहे, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवनप्रवास आणि वैवाहिक जीवनाविषयी
कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म वडोदरा येथे झाला. त्या त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील लष्करी अधिकारी आहेत. त्याचे वडील आणि आजोबांनी देखील भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी केंद्रीय विद्यालय, ईएमई येथे शिक्षण घेतले आणि नंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले.
कर्नल सोफिया कुरेशी सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये अधिकारी आहेत आणि एका पथकाचे नेतृत्व करत आहेत.
कर्नल कुरेशी यांचे पतीही भारतीय सैन्यात आहेत. त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे कर्नाटकमधील गोकाक तालुक्यातील कोन्नूर शहरातील आहेत. ते सध्या भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत आहे.
सध्या सोफिया जम्मूमध्ये तैनात आहे, तर त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी झाशीमध्ये तैनात आहेत.
लष्करी प्रशिक्षणादरम्यान सोफिया यांची भेट आपले पती ताजुद्दीन यांच्याशी झाली. दोघांमधील समन्वय इतका होता की लवकरच ही मैत्री प्रेमात बदलली.
या दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगाही भारतीय सशस्त्र दलात सामील होऊ इच्छितो आणि तो भारतीय हवाई दलाची तयारी करत आहे. त्यांच्या मुलीलाही सैन्यात भरती व्हायचे आहे.