Shubham Banubakode
ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत शांत आणि संयमी नेतृत्व दाखवले.
सोफिया यांचा जन्म वडोदरात 1974 मध्ये एका सैनिकी कुटुंबात झाला. त्यांचे वडील 1971 च्या बांगलादेश युद्धात लढले, तर त्यांचे आजोबाही सैन्यात होते.
2017 च्या मुलाखतीत सोफिया यांनी खुलासा केला की त्यांची खापर आजी 1857 च्या बंडात राणी लक्ष्मीबाईंसोबत योद्धा म्हणून लढली होती.
सोफिया आणि त्यांची जुळी बहीण शायना सन्सारा या दोघी सैनिकी वातावरणात वाढल्या. त्यांच्या आईने त्यांना सैन्यात सामील होण्यास प्रोत्साहन दिले.
सोफिया यांनी 1997 मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स पूर्ण केले. सध्या त्या भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत आहेत.
2016 मध्ये सोफिया या आसियान प्लस ‘फोर्स 18’ सैन्य सरावात भारतीय पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.
सोफिया यांचे पती देखील सैन्यात आहेत. 2016 च्या ‘फोर्स 18’ सरावात त्यांनी पतीसोबत एकत्र काम केले.
सोफिया यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही, तर तो देशसेवेच्या समर्पणाचा आणि कुटुंबाच्या सैन्या वारशाचं प्रतीक आहे.