Saisimran Ghashi
7 मे 2025 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत देशाला माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या मुख्य महिला सैन्य प्रवक्त्या ठरल्या.
कर्नल कुरेशी या बेळगाव जिल्ह्यातील कोन्नूर गावच्या कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्या सूनबाई आहेत. त्यांच्या कार्यामुळे बेळगावचा आणि कर्नाटकाचा मान उंचावला आहे.
गुजरातच्या वडोदरा येथे जन्मलेल्या कुरेशी यांचे वडील आणि आजोबा दोघेही भारतीय लष्करात कार्यरत होते. घरात लष्करी संस्कार असतानाही, त्यांनी स्वतःची ओळख कष्टातून निर्माण केली.
त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यानंतर चेन्नई येथील Officers Training Academy (OTA) मध्ये प्रशिक्षण घेऊन 2000 साली सिग्नल कोअरमध्ये नियुक्त झाल्या.
2006 मध्ये त्यांनी DR Congo मध्ये UN Peacekeeping मिशनमध्ये सहभाग घेतला, जिथे ceasefire मॉनिटरिंग, मानवी मदत आणि नागरिकांचे रक्षण यासाठी त्यांनी काम केलं.
त्यांनी 2016 मध्ये आसियान देशांच्या ‘Force 18’ मल्टीनॅशनल एक्सरसाइजमध्ये भारतीय लष्करी तुकडीचे नेतृत्व केले आणि या व्यायामात स्फोटक व्यवस्थापन व शांतता मिशन यांवर काम केले.
मिलिटरी प्रोवोस्ट युनिटमध्ये सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांनी पहिल्या महिला मिलिटरी पोलिस बॅचचं प्रशिक्षण दिलं, जी नक्षलप्रभावित भागात काम करत आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांचा अंदाजे पगार 1.5 लाख ते 2 लाख प्रतिमहिना असू शकतो, त्यांचा खरा सन्मान त्यांच्या देशसेवेच्या समर्पणामध्ये आहे
कर्नल सोफिया आणि डॉ. शायना सन्सारा या जुळ्या बहिणी आहेत. डॉ. शायना ही अर्थशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, फॅशन डिझायनर, माजी आर्मी कॅडेट, रायफल शुटिंगमध्ये राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती आहे.