Saisimran Ghashi
ब्रह्मांड स्थिर राहावं म्हणून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या समीकरणात एक 'कॉस्मोलॉजिकल स्थिरांक' घातला, परंतु नंतर त्यांनीच ती चूक असल्याचं मान्य केलं आणि पुढे हीच संकल्पना ‘डार्क एनर्जी’साठी उपयोगी ठरली.
आईन्स्टाईन यांना ब्रह्मांड सतत विस्तारत आहे हे मान्य करायला वेळ लागला. परंतु त्यांची सुरुवातीची शंका भविष्यातील संशोधनाला एक महत्त्वाचा प्रश्न ठरली.
त्यांनी स्वतःच्या सिद्धांतातून गुरुत्वीय लेन्सिंगचा अंदाज वर्तवला, पण त्यांना वाटलं ते कधीच दिसणार नाही नंतर हे खगोलशास्त्रातील क्रांतिकारी साधन ठरलं.
त्यांनी क्वांटम अनिश्चिततेवर विश्वास ठेवला नाही आणि "देव कधी फासे खेळत नाही" असं म्हटलं पण याच विरोधातून ‘एन्टेन्गलमेंट’सारखी क्रांतिकारी संकल्पना उदयास आली.
गुरुत्वीय लेन्सिंगबाबतचं गणित त्यांनी प्रथम प्रसिद्ध केलं नाही, परंतु जेव्हा मॅन्डल नावाच्या इंजिनिअरने आग्रह केला तेव्हा त्यांनी तो लेख लिहिला आणि त्याचा प्रभाव आजही मोठा आहे.
स्वतःच्या सिद्धांतावरच शंका घेत त्यांनी सिद्ध केलं की महान वैज्ञानिक होण्यासाठी आत्ममंथन आवश्यक असतं.
त्यांच्या चुकांमुळे नव्या वैज्ञानिक संकल्पना जन्माला आल्या. त्यांचे शिष्य आणि इतर संशोधक नवीन दृष्टीकोनातून संशोधन करू लागले.
आईन्स्टाईन यांनी जेव्हा नवीन सिद्धांत मांडले, तेव्हा त्यांनी तत्कालीन वैज्ञानिक मतांशी विरोध केला यातूनच वैज्ञानिक प्रगती झाली.
त्यांनी स्वतःच्या चुकांना खुलेपणानं स्वीकारलं आणि त्यामुळंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महानता अधोरेखित होते.
त्यांच्या चुकांनी विज्ञानाला वेगळी दिशा दिली. ज्यामुळं त्यांनी एक वैज्ञानिक म्हणून केवळ ज्ञानच नव्हे, तर विनम्रता आणि शिकण्याची वृत्तीही दाखवली.