सकाळ डिजिटल टीम
शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी चं कमी असणं तोंड येण्याचं मुख्य कारण ठरू शकतं.
अतितिखट, तेलकट आणि मसालेदार या पदार्थांचं सेवन शरीराला त्रास देऊन तोंड येण्याचं कारण होऊ शकतं.
अॅसिडिटी वाढवणारे पदार्थं, जसं की आंबट आणि मसालेदार खाद्य, तोंड येण्याचं कारण होतात.
नियमितपणे अपचन होणं हे तोंड येण्याचं एक कारण असू शकतं.
चहा, कॉफी, तंबाखू आणि धुम्रपान यांचा अति वापर तोंड येण्याचा कारण होऊ शकतो.
दात स्वच्छ न ठेवल्याने आणि दातांच्या समस्यांमुळे तोंड येऊ शकतं.
शरीरात उष्णता वाढल्यामुळे तोंडावर जखमा किंवा उल्सर होऊ शकतात.
दीर्घकाळ औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्ट्स तोंड येण्याचं कारण ठरू शकतात.