'या' औषधांसोबत चुकूनही पिऊ नका कॉफी, नाहीतर होतील गंभीर परिणाम

Anushka Tapshalkar

आजारपण आणि कॉफी

आजारी पडल्यावर अनेकांना कॉफी प्यायला आवडते. पण काही औषधांसोबत कॉफी घेणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पुढे दिलेल्या औषधांसोबत कॉफी घेणं टाळा.

Coffee for Relief in Illness

|

sakal

सर्दी/फ्लूची औषधे

कॉफीत असलेला कॅफीन आणि सर्दी-फ्लू औषधांतील स्यूडोएफेड्रीन एकत्र घेतल्यास हृदयाची धडधड, घाम येणे, अनिद्रा आणि चक्कर येण्याची शक्यता वाढते.

Viral Infection Medicines

|

sakal

अस्थमा औषधे

अस्थमा औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या थिओफिलाइनसारख्या द्रव्यांसोबत कॉफी घेणे टाळावे; यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.

Asthma Medicines

|

sakal

हृदयाची औषधे

कॉफी रक्तदाब आणि हृदय गती वाढवते, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित करणारी औषधे योग्य प्रकारे काम करत नाहीत.

Heart Medicines

|

sakal

थायरॉईड औषधे

लीवोथायरॉक्सिनसारखी औषधे घेतल्यावर लगेच कॉफी घेणे टाळा; यामुळे औषधाचे शोषण ५०% ने कमी होऊ शकते.

Thyroid Medicines

|

sakal

मानसिक आरोग्याची औषधे

सिलेक्तिव्ह सेरोटोनिन रिअप्टेक इनहिबिटर्स (SSRIs) आणि काही अँटीसायकॉटिक औषधांसोबत कॉफी घेतल्यास औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो किंवा साइड इफेक्ट्स वाढू शकतात.

Mental Health Medicines

|

sakal

दुखण्याची औषधे (पेनकिलर्स)

अॅस्पिरिन किंवा पॅरासिटामोलसारखी औषधे कॉफीसोबत घेतल्यास जठराची अस्वस्थता, जळजळ किंवा रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते.

Painkillers

|

sakal

औषधांमध्ये आधीपासून कॅफीन

काही सर्दी, फ्लू किंवा पेनकिलर औषधांमध्ये आधीपासून कॅफीन असते; त्यासोबत कॉफी घेणे जोखीम वाढवते, त्यामुळे काळजी घ्या.

Some Medicines Contain Caffeine

|

sakal

औषधांच्या आधी वापरून बघा हे ५ किचन अँटिबायोटिक्स

Kitchen Antibiotics

|

sakal

आणखी वाचा