सकाळ डिजिटल टीम
भारतामध्ये सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर आवश्यक मानला जातो, परंतु अनेकजण अजूनही लाजेखातर ते टाळतात.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 'भारतात कंडोम वापराचे प्रमाण कमी होत आहे, जे चिंताजनक आहे.'
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2021-22 नुसार, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सर्वाधिक कंडोम वापर केला जातो. येथे दर 10,000 जोडप्यांपैकी 993 जोडप्यांकडून कंडोमचा वापर केला जातो.
त्यानंतर आंध्र प्रदेश (978 जोडपी), पुद्दुचेरी (960), पंजाब (895), चंदीगड (822), आणि हरियाणा (685) येतात.
याउलट, कर्नाटकमध्ये वापराचे प्रमाण सर्वात कमी असून फक्त 307 जोडपी कंडोम वापरतात. गुजरात (430), हिमाचल प्रदेश (567), राजस्थान (514) याठिकाणीही वापर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे.
आंध्र प्रदेश – 0.69 %
तेलंगणा – 0.49 %
कर्नाटक – 0.47 %
दिल्ली – 0.41 %
महाराष्ट्र – 0.36 %
पुद्दुचेरी – 0.35 %
पंजाब – 0.27 %
दादरा व नगर हवेली – 0.23 %
तामिळनाडू – 0.23 %
देशभरातून दरवर्षी सुमारे 33 कोटी कंडोम विकले जातात, यापैकी एकट्या उत्तर प्रदेशात 5.3 कोटी कंडोम खरेदी होतात.