सकाळ वृत्तसेवा
कधी कधी लोक दोन्ही झेंड्यांमध्ये गोंधळ करतात. चला तर मग जाणून घेऊया काय फरक आहे.
पाकिस्तान विरोधी आंदोलनात काही लोकांनी पाक झेंडा चिरडला, तर काहींनी हरव्या रंगाचा झेंडा चिरडला आहे.
काही लोक म्हणतात हा इस्लामिक झेंडा आहे.
हिरवा झेंडा म्हणजे पाकिस्तानचा झेंडा नसतो. फक्त हिरवा रंग असणे पुरेसे नाही.
पाक झेंड्याचा रंग गडद हिरवा असतो. त्यावर तिरका चंद्र आणि त्याच्या समोर तारा असतो. बाजूला पांढरी पट्टी असते.
इस्लामिक झेंड्याचा रंग हलकासा हिरवा असतो. चंद्र सरळ असतो आणि तारा असतो.
भारतामध्ये पूर्वीही अनेकदा इस्लामिक झेंडा आणि पाक झेंड्यात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतामध्ये पाकिस्तानी झेंडा फडकवणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक.
पाकिस्तानी झेंड्यातील पांढरी पट्टी देशातील अल्पसंख्याकांचे प्रतीक आहे.
इस्लामिक झेंडा प्रामुख्याने धार्मिक समारंभ, मिरवणुका आणि इस्लामिक कार्यक्रमांमध्ये वापरला जातो.
चंद्र प्रगतीचे प्रतीक आहे, तर तारा प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
भारतामध्ये परकीय राष्ट्राचा झेंडा फडकवण्यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे, अन्यथा कारवाई होते.