New Monkey Species : गुलाबी-नारंगी ओठ अन् काळे केस! आफ्रिकेच्या घनदाट जंगलात सापडली माकडाची अतिशय दुर्मिळ प्रजाती, पाहा PHOTO

बाळकृष्ण मधाळे

काँगोच्या जंगलात माकडाच्या नव्या प्रजातीचा शोध

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दाट जंगलात माकडाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला असून, या शोधामुळे वन्यजीव संशोधन क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

New monkey species discovered in Congo

|

esakal

नव्या प्रजातीचे काय वैशिष्ट्य?

या नव्या प्रजातीचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे आकर्षक गुलाबी-नारिंगी रंगाचे ओठ.

New monkey species discovered in Congo

|

esakal

काळ्या केसांचं माकड

काळ्या केसांनी आच्छादलेलं हे दुर्मिळ माकड काँगोच्या मध्य-पूर्व भागातील लोमामी नॅशनल पार्कमध्ये आढळलं आहे.

New monkey species discovered in Congo

|

esakal

उंच झाडांच्या शेंड्यांवर राहणारं माकड

घनदाट जंगलातील उंच झाडांच्या शेंड्यांवर राहणाऱ्या या माकडाचं दर्शन होणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं.

New monkey species discovered in Congo

|

esakal

संशोधनाला गती

स्थानिक नागरिक आणि संशोधकांनी त्याचे काही फोटो टिपल्यानंतर या अनोख्या प्राण्याबाबत संशोधनाला गती मिळाली.

New monkey species discovered in Congo

|

esakal

माकडाचं पहिलं दर्शन कधी झालं होतं?

या माकडाचे पहिले दर्शन २००८ मध्ये पर्यावरणप्रेमींना झाले होते. मात्र, त्यावेळी केवळ अस्पष्ट छायाचित्र मिळाल्याने त्याची ओळख निश्चित होऊ शकली नव्हती.

New monkey species discovered in Congo

|

esakal

दहा वर्षांनी पुन्हा दिसलं माकड

त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी हे माकड पुन्हा दिसल्यानंतर आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.

New monkey species discovered in Congo

|

esakal

संशोधकांनी केला अभ्यास

या अभ्यासादरम्यान संशोधकांनी माकडांचे आवाज रेकॉर्ड केले, त्यांची छायाचित्रे घेतली आणि डीएनएचे सविस्तर विश्लेषण केले. या सर्व वैज्ञानिक तपासणीनंतर हे माकड स्वतंत्र आणि पूर्णपणे नवीन प्रजातीचे असल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली.

New monkey species discovered in Congo

|

esakal

आफ्रिका खंडात पाचवी प्रजाती

विशेष म्हणजे, गेल्या ७५ वर्षांत आफ्रिका खंडात शोध लागलेल्या माकडांच्या नव्या प्रजातींपैकी ही पाचवी प्रजाती आहे. त्यामुळे हा शोध जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

New monkey species discovered in Congo

|

esakal

ज्युनियर अंबोको यांची महत्त्वपूर्ण भूमिका

या संशोधनात फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करणारे संशोधक ज्युनियर अंबोको यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

New monkey species discovered in Congo

|

esakal

'PLoS One'मध्ये प्रकाशित

अंबोको यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित 'PLoS One' या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.

New monkey species discovered in Congo

|

esakal

Raigad Albino Snake : हा साप 'बिनविषारी', पण दिसतो एकदम वेगळा! रायगडमध्ये सापडलेल्या 'अल्बिनो चंचु वाळा' सापाविषयी तुम्हाला 'हे' माहीत आहे का?

Rare Albino Snake Found in Raigad

|

esakal

येथे क्लिक करा...