Aarti Badade
आजच्या वेगवान युगात पुरुषांमध्ये सतत थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीचा थकवा शारीरिक मेहनतीचा होता, पण आता तो मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित झाला आहे.
Causes of fatigue in men
Sakal
उशिरापर्यंत मोबाईलचा वापर आणि अनियमित दिनचर्या यामुळे झोपेची गुणवत्ता ढासळते. अपुऱ्या झोपमुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि चिडचिडेपणा वाढतो.
Causes of fatigue in men
Sakal
वेळेअभावी बाहेरील तेलकट आणि जंक फूडवर अवलंबून राहिल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळत नाहीत. पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे शरीर लवकर थकते.
Causes of fatigue in men
Sakal
तासनतास बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे स्नायू कमकुवत होतात. शारीरिक सक्रियता नसल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि आळस वाढतो.
Causes of fatigue in men
Sakal
मधुमेह, थायरॉईड किंवा टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या हार्मोन्सची पातळी कमी झाल्यानेही सतत कमजोरी जाणवू शकते. अशा वेळी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते.
Causes of fatigue in men
Sakal
धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे शरीरातील ऊर्जा पातळी झपाट्याने खाली येते आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो.
Causes of fatigue in men
Sakal
कामाचा ताण कमी करण्यासाठी दररोज १५-२० मिनिटे योग किंवा ध्यान (Meditation) करा. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि उत्साह वाढतो.
Causes of fatigue in men
Sakal
वेळेवर झोप, संतुलित घरगुती आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर करा. थकवा दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Causes of fatigue in men
Sakal
Heart attack in toilet winter
Sakal