Saisimran Ghashi
तुमच्या शरीरात सतत वेदना होणे हे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते
तीव्र आणि सतत पाठदुखी जी विश्रांतीने किंवा औषधांनी कमी होत नाही, तो गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.
मूत्रपिंडाचा कर्करोग असताना वेदना एकतर्फी आणि कंबरच्या मागील भागात अधिक जाणवते.
स्तन, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कर्करोग पाठीच्या कण्यामध्ये पसरण्याने नसांवर दबाव निर्माण करतो.
वरच्या पोटापासून मध्यभागी किंवा खालच्या पाठीपर्यंत वेदना असणे स्वादुपिंडाचा कर्करोग दर्शवू शकते.
सतत पोटदुखी किंवा ओटीपोटात वेदना कर्करोगाचे गंभीर लक्षण असू शकतात.
गर्भाशयाचा कर्करोग सायलेंट किलर मानला जातो, जो फुगणे आणि ओटीपोटात दाब जाणवून दिसतो.
आतड्यांच्या सवयींमध्ये बदल, मलात रक्त किंवा सतत अपचन हे कोलन व पोटाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.