हिवाळ्यात जवसाचे सेवन करा, होतील अनेक फायदे

Anushka Tapshalkar

जवस

जवस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

Flax Seeds | sakal

आहार

अशा वातावरणात आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असते जे आतून पोषण देतील आणि शरीराची उब टिकवून ठेवतील. त्यामुळे हिवाळ्यात जवसाच्या बियांचे सेवन करणे लाभदायक ठरू शकते.

Healthy Diet | sakal

हिवाळा

हिवाळ्यात खास करून याचे सेवन केल्यास जवस फार फायदेशीर ठरते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तसेच शरीर उबदार ठेवण्यासाठी जवसाच्या बिया खाणे उपयुक्त ठरते.

Winter | sakal

पोषणमूल्ये

जवसामध्ये व्हिटॅमिन्सच्या व्यतिरिक्त कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, आणि झिंक सोबत अनेक मिनरल्स असतात जे आपल्या हाडांना ताकद देण्याचे काम करतात आणि जास्तीत जास्त काळासाठी हाडांना मजबूत ठेवतात.

Nutrients | sakal

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्

हे ओमेगा-३ फॅटी ऍसिड्सचा एक उत्तमी स्रोत आहे. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Omega -3 Fatty Acids | sakal

हेल्दी फॅट्स

जावसतील हेल्दी फॅट्स त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Healthy Fats | sakal

अँटिऑक्सिडंट्स

जवसामध्ये जे अँटिऑक्सिडंट्स असतात ते फ्री रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे आपली त्वचा लवकर वयस्कर होणं टळते.

Antioxidants | sakal

सेवन

जवसाचे सेवन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. याचे सेवन सूप, सॅलड मध्ये करू शकतो. तसेच याची चटणी करून किंवा लाडू बनवूनही याचे सेवन केले जाऊ शकते.

Ladoo | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Consult Doctor | sakal

जर तुम्ही डाळिंब खात असाल तर 'या' 5 गोष्टी टाळा

Overeating | sakal
आणखी वाचा