Aarti Badade
पोट रिकामं असल्याने मेंदूला ऊर्जा मिळवण्याची आवश्यकता असते. म्हणून पौष्टिक ब्रेकफास्ट करणे गरजेच आहे.
सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्या, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
रात्री भिजवलेले 5 बदाम सकाळी खाल्ल्याने मँगेनिज, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा-3 मिळतात.
पपईमुळे पोट साफ होतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, आणि व्हिटॅमिन ए असते ते डोळ्यांसाठी फायदेशीर असते व हृदयरोगाचा धोका कमी होतो.
सकाळी कोमट पाण्यात मध घालून प्यायल्याने शरीराला मिनेरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.
उपाशीपोटी उकडलेली अंडी खाल्ल्याने वजन कमी होतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं.
रात्री भिजवलेल्या सब्जा बिया सकाळी खाल्ल्याने प्रोटीन, फायबर, आणि कॅल्शियम मिळतात.
बदामाऐवजी शेंगदाणेदेखील खाऊ शकता, हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.