सकाळ डिजिटल टीम
खाद्य पदार्थांचा स्वाद वाढवतेच त्याच बरोबर माऊथ फ्रेशनर म्हणूनही ती उपयोगी आहे. वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्याने आरोग्य निरोगी होते.
पोट वाढलेलं असेल आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल तर रोज रात्री 2 वेलची खाऊन गरम पाणी प्या. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शिअममुळे वजन कमी करण्यात मदत होते.
वेलची ब्लड प्रेशर कमी करण्यातही उपयोगी आहे. पोटॅशिअम आणि फायबर अधिक प्रमाणात असतं जे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे करतं.
अनेकदा लोक भलतं सलतं खाऊन घेतात आणि त्यामुळे पोट खराब होतं. वेलचीमुळे या त्रासापासून सुटका मिळते.
रोज वेलची खाल्ल्याने यूरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.
रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात.