वजन कमी करणायासाठी 'या' फळाचे सेवन नक्की करा

Anushka Tapshalkar

देवदूतांचे फळ

पपई हे एक स्वादिष्ट आणि पोषणांनी समृद्ध फळ आहे. पपईला 'देवदूतांचे फळ' किंवा 'fruit of the angels' असेही म्हटले जाते.

Fruit of the Angels | sakal

पोषकतत्त्व

पपई व्हिटॅमिन आणि फायबर सारख्या अनेक पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे शारीराचे चयापचय वाढते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

Nutrients | sakal

अनावश्यक खाणे

पपईमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे आपल्याला पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे सारखं सारखं खाणे टळते.

Overeating | sakal

पपेन

पपईमध्ये असलेले पपेन पचनास उपयुक्त असते. त्यामुळे प्रथिनांचे शोषण होण्यास मदत होते.

Papain | sakal

कॅलरी

पपईमध्ये कॅलरीज कमी असतात. याव्यतिरिक्त, पपईमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

Calories | sakal

नाश्ता

पपईचे सेवन आपण कधीही करू शकतो, पण नाश्त्याच्या वेळी पपईचे सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

Breakfast | sakal

निरोगी जीवनशैली

या सर्व गोष्टी मिळून पपई वजन कमी करण्यास मदत करते, परंतु वजन कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली असणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

Healthy Lifestyle | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Consult Doctor | sakal

दररोज 2 अक्रोड खाल्ल्यास काय होते?

Benefits Of Eating Walnuts Everyday | Akhrot | sakal
आणखी वाचा