मधुमेहावर मात करण्यासाठी इतके मिनिटे करा व्यायाम!

Aarti Badade

सुरुवातीचे नियंत्रण आहे महत्त्वाचे

भारतात मधुमेहाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. मधुमेहाचे निदान झाल्याबरोबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Blood sugar control exercise

|

Sakal

व्यायामाचा 'सुवर्ण नियम'

प्रत्येक प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करायला हवा. म्हणजेच, आठवड्यातील ५ दिवस दररोज ३० ते ६० मिनिटे व्यायामासाठी देणे फायद्याचे ठरते.

Blood sugar control exercise

|

Sakal

वजन कमी करणे

व्यायामामुळे केवळ वजन कमी होत नाही, तर हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा प्राणवायू मिळतो, ज्यामुळे झोप सुधारते.

Blood sugar control exercise

|

Sakal

बसल्या-बसल्याही करता येईल हालचाल

व्यायामासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी किंवा घरी बसल्या-बसल्या पायांच्या, हातांच्या आणि खांद्यांच्या हालचाली करा. चालणे किंवा स्ट्रेचिंग करा.

Blood sugar control exercise

|

Sakal

घरगुती कामांतून व्यायाम

आंघोळ बसून करा, चहा घेतल्यानंतर थोडे स्ट्रेचिंग करणे किंवा भिंतीचा आधार घेऊन 'पुशअप्स' काढणे यांसारखे सोपे प्रकार तुम्ही करू शकता. जेवणानंतर १००० पावले चालणे.

Blood sugar control exercise

|

Sakal

योगासने आणि सूर्यनमस्कार

व्यायामासोबत योगासने केल्यास शरीराची लवचिकता वाढते. नियमित सूर्यनमस्कार घालणाऱ्या व्यक्तींचा शारीरिक तोल (Balance) उत्तम राहतो आणि स्नायूंची ताकद वाढते.

Blood sugar control exercise

|

Sakal

साध्या वस्तूंचा वापर करा

व्यायाम करण्यासाठी महागड्या उपकरणांची गरज नाही. घरातील खुर्ची, भिंत, जिन्याचा जिना किंवा चक्क एक लिटर पाण्याच्या बाटलीचा वापर करून व्यायाम करू शकता.

Blood sugar control exercise

|

Sakal

मेंदूचे रहस्य! ‘या’ 7 सवयी दाखवतात तुम्ही स्वतःलाच कसे फसवताय

Psychology of human brain

|

Sakal

येथे क्लिक करा