Aarti Badade
ब्लूबेरी हे कमी कॅलोरी असलेले फळ असून वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
ब्लूबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात.
ब्लूबेरी नियमित खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य टिकते, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ब्लूबेरी फायदेशीर आहे, अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे.
ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि फायबर असते, जे पचनासाठी आवश्यक आहे.
हे फळ पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांनी भरलेले आहे, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
ब्लूबेरी वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर ब्लूबेरीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.
आजकाल ब्लूबेरी बाजारात किंवा ऑनलाइन सहज उपलब्ध आहे.
दररोजच्या आहारात थोडी ब्लूबेरी घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा भाग बनवा.