Aarti Badade
चाकवतसारखी दिसणारी ही भाजी वजन घटवण्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
चिलभाजी, चंदनबथुवा, चिलधावडी – वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
हिचं शास्त्रीय नाव आहे Portulica oleracea, जी मुख्यतः हिवाळ्यात शेतांमध्ये उगम पावते.
हिरवट रंगाची पाने, दातेरी कडा आणि मध्यम लांबीचे देठ – अशी ओळख आहे या भाजीची.
ही भाजी वाळवून वर्षभर साठवता येते आणि बिगरहंगामी काळात वापरता येते.
पाने धुवून, फोडणीत अर्धवट शिजवतात, मग बेसन टाकून मंद आचेवर शिजवतात – साधा पण पौष्टिक पदार्थ!
या भाजीतील फायबर अपचन दूर करतं आणि पचनसंस्था मजबूत करतं.
अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्व क मुळे सर्दी, खोकला व इन्फेक्शनपासून संरक्षण मिळतं.
कॅल्शिअम व मॅग्नेशियममुळे ही भाजी हाडे व सांधेदुखीसाठीही लाभदायक आहे.
चंदनबथुवा ही केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे – नक्की ट्राय करा!