हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात या ६ गोष्टींचा नक्की समावेश करा!

Anushka Tapshalkar

हाय ब्लड प्रेशर

सतत रक्ताचा दाब वाढलेला असणे म्हणजेच उच्च रक्तदाब (High Blood Pressure) होय. यामुळे हृदयावर जास्त ताण येऊन हार्ट अटॅक, स्ट्रोकसह इतर आजारांचाही धोका वाढतो.योग्य आहार व जीवनशैलीमुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करता येतो. त्यासाठी रोजच्या पोषक अन्नपदार्थांचा जेवणात समावेश करा.

High Blood Pressure

|

sakal

हिरव्या पालेभाज्या

बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पालेभाज्या जसे की मेथी, पालक, शेपू या फाइबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. ज्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

Green Leafy Vegetables

|

sakal

बेरीजचा समावेश

अनेक वेळा अनेक लोक क्रॅनबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारखी फळे खाणे टाळतात. परंतु त्यामध्ये अँथोसायनिन मुबलक प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Berries

|

sakal

बीट खा

बीटामधील नाइट्रेट रक्तवाहिन्यांना सैल करून त्यांचा विस्तार करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.Banana

Beetroot

|

sakal

रोज एक केळं खा

केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असते, जे अतिरिक्त सोडियम बाहेर टाकून ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.

Banana

|

sakal

रसाळ फळे खा

संत्रं, लिंबू, मोसंब, द्राक्ष यांसारखी फळे व्हिटॅमिन C आणि पोटॅशियमने युक्त असतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होते.

Citrus Fruits

|

sakal

नट्स आणि बिया खा

बादाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया यामध्ये उत्तम फॅट आणि ओमेगा-३ असतात, जे हृदय आणि रक्तदाबासाठी लाभदायक आहेत.

Nuts and Seeds

|

sakal

संतुलित आहार आणि जीवनशैली राखा

फक्त आहारच नाही तर व्यायाम, ताण कमी करणे आणि धूम्रपान न करणेही आवश्यक आहे.

Balanced Diet and Healthy Lifestyle

|

sakal

वेळेवर उपाय करा

उच्च रक्तदाब वेळेत नियंत्रित न केल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे आजपासूनच चांगल्या सवयी अंगीकारा!

Timely Treatment is Must

|

sakal

ऑफिमधील ताण-तणाव कमी करून मानसिक आरोग्य कसे जपाल?

Tips to Reduce Workplace Stress 

|

sakal

आणखी वाचा