ऑफिमधील ताण-तणाव कमी करून मानसिक आरोग्य कसे जपाल?

Anushka Tapshalkar

कामाच्या ठिकाणचा ताण

कामाच्या ठिकाणी वाढता तणाव उत्पादकता (Productivity) आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. पण काही सोप्या टिप्सने तो नियंत्रणात ठेवता येतो.

Stress at Workplace

|

sakal

दीर्घ श्वसनाने मन शांत करा

तणाव वाढला की श्वास जलद आणि उथळ होतो. खोल श्वसन(Deep Breathing), जसे 4-7-8 पद्धतीने श्वास घेणे, मन शांत करायला मदत करते.

Deep Breathing

| sakal

दर काही वेळाने छोटे ब्रेक्स घ्या

सतत काम करत राहिल्याने मानसिक थकवा येतो. स्मॉल ब्रेक्स घेऊन थोडा वेळ चालणे किंवा स्ट्रेच केल्याने ऊर्जा आणि एकाग्रता वाढते.

Take Short Breaks Between Work

|

sakal

मर्यादा ठेवा आणि ‘नाही’ म्हणायला शिका

अधिक काम स्वीकारल्यामुळे तणाव वाढतो. गरजेनुसार 'नाही' म्हणल्यास कामाचा ताण कमी होतो आणि मन शांत राहते.

Set Boundaries and Learn to Say NO

|

sakal

काम व्यवस्थित आखा

मोठ्या कामांमुळे गोंधळ निर्माण होतो. प्राधान्यक्रम निश्चित करा, काम छोट्या भागांमध्ये विभागा आणि काम व्यवस्थापन साधनांचा (Work Management Tools) वापर करा.

Manage Tasks and Work Properly

|

sakal

सहकाऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करा

कामाच्या ठिकाणी सहकारी मित्रांसारखे असले की तणाव आपोआप कमी होतो. एकमेकांशी संवाद साधणे, मदत करणे आणि हसत खेळत काम करणे मनाला हलकं आणि आनंदी ठेवते.

Build a Good and Friendly Relationship with Your Colleague

|

sakal

व्यायाम करा

थोडे-थोडे चालणे असो, जिममध्ये किंवा घरच्या घरीच व्यायाम करणे असो, यामुळे एंडॉर्फिन हार्मोन्स तयार होतात आणि तणाव व नैराश्य कमी होते.

Exercise

|

sakal

ध्यान करा

दररोज 10-15 मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि चिंता कमी होते.

Meditate

|

sakal

नोट

दररोज हे उपाय करूनही ताण-तणाव कमी करण्यात अडचण येत असेल, तर तज्ज्ञांची मदत नक्कीच घ्या.

Take Help of a Professional

|

sakal

स्वयंपाकघरातील हा मसाला रोगप्रतिकारशक्तीसाठी आहे एक नंबर!

Indian Spice that Boosts Immunity and Improves Health | Pepper 

|

sakal

आणखी वाचा