सकाळ डिजिटल टीम
सलमान खान यंदाच्या ईदला चाहत्यांसाठी एक मोठा चित्रपट देणार आहे. ‘सिकंदर’ या चित्रपटाची घोषणा केली गेली असून, तो ईदला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे, आणि त्यानंतर ‘सिकंदर’ चित्रपटावर जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.
काही लोकांनी संशय व्यक्त केला आहे की, ‘सिकंदर’ हा दक्षिण भारतातील सुपरस्टार थलपती विजयच्या ‘सरकार’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असू शकतो.
चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल राशिद खान (केआरके) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दावा केला की, 'सिकंदर' हा विजयच्या 'सरकार'चा रिमेक आहे.
केआरकेच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर ‘सिकंदर’ आणि ‘सरकार’ चित्रपटातील काही समान दृश्यांची तुलना करण्यात आली आहे.
तथापि, काही चाहत्यांनी म्हणाले की, चित्रपटातील दृश्यांमध्ये स्पष्ट समानता दिसत नाही आणि प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सत्यता कळेल.
‘सिकंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले असून, यात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.