सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या चर्चेत आहे, तिचा ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही, पण रकुल आणि भूमी पेडणेकरच्या अभिनयाची प्रशंसा झाली.
रकुलला आता ‘रेस’ फ्रेंचायजीच्या चौथ्या भागात संधी मिळाली आहे, जिथे ती सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
रकुल आणि सैफ अली खान या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
२०२४ मध्ये निर्माते रमेश तौरानी यांनी ‘रेस ४’ची अधिकृत घोषणा केली होती, आणि सैफ अली खान याचा भाग असणार असल्याचं सांगितलं होतं.
रकुलने या थ्रिलर चित्रपटात सैफसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘रेस ४’ थरार आणि ॲक्शनने भरलेला चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना नवे ट्विस्ट देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.