Varsha Balhe
ऑस्ट्रेलियातील कूबर पेडी शहरात जवळपास ६० टक्के लोक जमिनीखाली बांधलेल्या घरांमध्ये राहतात. या घरांना डगआउट्स असं म्हणतात.
underground city
esakal
या भागात उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोकांनी जमिनीखाली घरं बांधायला सुरुवात केली.
underground city
esakal
बाहेर कितीही उकाडा असला तरी जमिनीखालील घरांमध्ये तापमान तुलनेने थंड राहतं. त्यामुळे एसीची गरजही कमी भासते.
underground city
esakal
ही घरं मऊ खडक खोदून तयार केली जातात. घराच्या भिंतींवर खडकांचा नैसर्गिक लालसर आणि पिवळसर रंग दिसतो.
underground city
esakal
या घरांमध्ये बेडरूम, दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि बाथरूम अशा सर्व सुविधा असतात. टीव्ही, वाय-फाय आणि फर्निचरही पाहायला मिळतं.
underground city
esakal
जमिनीखाली असल्यामुळे या घरांमध्ये बाहेरच्या खिडक्या नसतात. मात्र, हवा येण्यासाठी खास व्हेंटिलेशन पाईप आणि प्रकाशासाठी दिव्यांची व्यवस्था असते.
underground city
esakal
कूबर पेडीमध्ये फक्त घरंच नाहीत, तर चर्च, हॉटेल्स, संग्रहालयं आणि दुकानेही जमिनीखाली आहेत. त्यामुळे या शहरात जमिनीखाली एक वेगळंच जग पाहायला मिळतं.
underground city
esakal
Mongoose vs Civet
esakal