सकाळ डिजिटल टीम
आपल्या शरीरात चांगले आणि वाईट बॅक्टेरिया असतात. चांगला बॅक्टेरिया शरीराच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतो.
प्रोबायोटिक्स म्हणजे शरीरासाठी फायदेशीर बॅक्टेरिया. ते शरीराची प्रतिकारक्षमता वाढवतात आणि पचनसंस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.
कांजी उत्तर भारतात लोकप्रिय प्रोबायोटिक ड्रिंक आहे. ते शरीराच्या पचनसंस्थेसाठी मदत करते आणि चवीला मस्त असते.
कांजी तयार करणे अगदी सोपे आहे. एकदा तयार केल्यावर ते जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही.
१ बीट, १ गाजर, २-३ मिरच्यांचा चुरा, मीठ, जिरे पूड, आणि १.५ लिटर पाणी.
काचेच्या बरणीत १.५ लिटर पाणी घ्या. त्यात चिरलेले बीट, गाजर, आणि मिरच्यांचा चुरा घाला.त्यात मीठ आणि जिरे पूड घाला.बरणीचे तोंड स्वच्छ फडक्याने बंद करा आणि दोन दिवस उन्हात ठेवा.
दोन दिवसांनी कांजी तयार होईल. त्यातील तुकडे काढून फ्रिजमध्ये ठेवा.गार झाल्यावर थंडगार कांजी प्या.
कांजी शरीरासाठी फायदेशीर असून ते ताजे आणि थंड असावे. जास्त दिवस टिकत असले तरी लवकर संपवावे.